तावडे हितवर्धक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

करिअर संदर्भातील विविध प्रकारची माहिती देणार

मुंबई : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबई यांच्या वतीने तावडे समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दादर येथील वनमाळी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुंबईच्या महापौर मा. सौ. रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह आणि शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध समुपदेशक प्रा. श्री. आनंद म्हापुसकर यांचे पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. तसेच मंडळाच्या कलाविभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांसाठी चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याचबरोबर मंडळाने समाजातील विविध कल्याणकारी योजनांची माहितीही जाहीर केली आहे. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात भव्य मराठा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून वधू-वर नोंदणी, उपवर युवक-युवतींसाठी नोंदणी शुल्कात विशेष सवलत आणि ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच मंडळाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना दरमहा ₹५०० शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, तावडे समाजासाठी वसतिगृह, तसेच बांधकाम सुरू असलेल्या श्री समकोटेश्वर मंदिर व तावडे अतिथी भवन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे.

मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे व राजेंद्र तावडे, सचिव सतीश तावडे आणि खजिनदार प्रदीप तावडे यांनी समाजबांधवांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button