भडगाव (तालुका कुडाळ) : सह्याद्री माध्यमिक विद्यालय अर्थात भडगाव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहज आणि आत्मविश्वासाने बोलता यावी, यासाठी ‘SpeakSmart’च्या माध्यमातून इंग्रजी संभाषणाचा उपक्रम राबविला जात आहे. केवळ इंग्रजी शिकविण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या English Speaking कौशल्यासह संवादकौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यावर भर दिला जात आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याची भीती कमी होत असून, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे इंग्रजीत संवाद साधताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची माहिती परिसरातील गावांमध्ये पोहोचल्याने अनेक पालक व विद्यार्थी भडगाव हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण शिक्षणाची नवी दिशा देणाऱ्या शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन!
