पालघरमध्ये चालक पोलीस भरती लेखी परीक्षा रविवारी; कडेकोट पोलीस बंदोबस्त

पालघर : जिल्हा पोलीस दलातर्फे सन २०२४-२५ मधील चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा रविवार, दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड येथे पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेत ७ रिक्त पदांसाठी झालेल्या मैदानी व कौशल्य चाचण्यांमधून पात्र ठरलेल्या एकूण १८८ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या किमान दोन तास आधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेकरिता विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक अधिकारी व ९२ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. परीक्षाकेंद्रावर ९ वर्गखोल्यांमध्ये CCTV देखरेख ठेवण्यात आली असून, गेट व परिसरात अतिरिक्त १९ कॅमेरे तसेच प्रत्येक वर्गात हॅन्डीकॅमद्वारे नजर ठेवली जाणार आहे.


उमेदवारांच्या तपासणीसाठी ४ HHMD व २ DFMD यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सक्त बंदी घालण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


लांबून येणाऱ्या उमेदवारांसाठी लायन्स क्लब हॉल येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व फोटो सोबत ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

############

(ᴅᴇɴɪᴍʜᴜʙ VIRAR 👔👖)

𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐎𝐅𝐅𝐄𝐑 𝐅𝐎𝐑 𝐂𝐎𝐍𝐓𝐀𝐂𝐓 𝐋𝐈𝐒𝐓 𝐌𝐄𝐌𝐁𝐄𝐑𝐒 BUY 3 T-SHIRT :- 1099 ONLY BUY 3 SHIRT :- 1499 ONLYBUY 3 P.SHIRT :- 1999 ONLYBUY 3 P DENIM :- 2499 ONLY𝕊ℙ𝔼ℂ𝕀𝔸𝕃 𝔾𝕀𝔽𝕋 🎁 299₹ Denim Perfume on purchases of 3000₹ 🫶🏻✨720₹ shirts free on purchase of Rs. 5000₹ 🫶🏻✨INSTA ID 🆕 UPDATE 👀

https://www.instagram.com/denimhub_virar?igsh=MTJmdzdiMjJsbHJneA==| JOIN GROUP https://chat.whatsapp.com/D1u9uGhoAwoCLpT4jz2c1h

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button