पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ सप्टेंबरला ‘श्रावण महोत्सव-२०२६’


पालघर : पालघर नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांसाठी ‘श्रावण महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी लायन्स क्लब, पालघर येथे उत्साहात पार पडणार आहे.


महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते ११ वाजता उद्घाटन सोहळा होणार असून त्यानंतर पाककला स्पर्धेचे सेटअप लावण्यात येणार आहे.


सकाळी ११.१५ ते दुपारी २.१५ या वेळेत महिलांसाठी मेहंदी स्पर्धा, तर ११.१५ ते १.१५ या वेळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सकाळी ११.३० वाजल्यापासून मंगळागौर व पारंपरिक नृत्याचे आयोजन करण्यात येणार आहे.


या महोत्सवात पालघर शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालघर नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button