पालघर : टेंभोडे येथील ब्युटीशियन सौ. विधी विवेक पाटील यांनी सौंदर्य क्षेत्रातील आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळवली आहे. गेल्या १३ वर्षांपासून त्या कॉस्ट्रेन फॅमिली सलोनमध्ये कार्यरत आहेत.
एप्रिल २०२६ मध्ये मुंबईतील नेस्को येथे आयोजित एच बी एस स्पर्धेत त्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत रिजनल रँक मिळवला. रागा स्कीन एक्सपर्टच्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अशोक यादव तसेच टेक्निकल एज्युकेटर आस्था मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळाली.
“राष्ट्रीय स्तरावर स्वतःमधील कौशल्य दाखवण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. टेंभोडे गावासह महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असे विधी पाटील यांनी सांगितले. या यशाबद्दल स्थानिक नागरिक व व्यावसायिक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी रागा कंपनीचे आभार मानले.
