भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाविक सोरठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डहाणू : डहाणूचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व समर्पित कार्यकर्ते श्री. भाविक सोरठी यांच्या आकस्मिक निधनाने भाजपा परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल पुणे येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाविक सोरठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पक्षाच्या विचारधारेवर अढळ श्रद्धा ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी कै. सोरठी यांनी दिलेले योगदान तसेच पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यावेळी आवर्जून स्मरणात आणण्यात आले. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

कै. भाविक सोरठी यांच्या आकस्मिक निधनामुळे डहाणूच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रासह भाजपा परिवाराची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह असंख्य कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना भाजपा परिवाराच्या वतीने करण्यात आली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळून कै. सोरठी यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button