आवळेगाव पूर्व देऊळवाडीतील कासले कुटुंबीयांच्या गणपतीला हरिनामाचा जागर

आवळेगाव : आवळेगाव पूर्व देऊळवाडी येथील संजना कासले सोशल फाऊंडेशनमध्ये कार्यरत तसेच प्रसिद्ध यू-ट्यूबर प्रणिता कासले यांच्या कासले कुटुंबीयांच्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त कासले यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी अनेक नामवंत भजन गायकांनी उपस्थित राहून भक्तिगीते व हरिनामाचा जयघोष केला. टाळ-मृदंगाच्या गजरात रंगलेल्या या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण देऊळवाडी परिसर दुमदुमून गेला. गणरायाच्या दर्शनासह हरिनामाच्या गजराचा आनंद भाविकांनी घेतला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button