अलिबाग : रायगड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या अलिबाग येथील सावतामाळी सहकारी पतसंस्थेला ‘रिसेल डॉट इन’ संस्थेच्या वतीने पुणे येथे आयोजित सोहळ्यात ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन रमेश नाईक यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या पतसंस्थेच्या 107 कोटींच्या ठेवी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष जगदीश कवळे, संचालक हर्षल नाईक, अजय राऊळ, अतुल वर्तक, व्यवस्थापक राकेश म्हात्रे, लेखापाल श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या पुरस्कारामुळे संस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे यावेळी अध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले.
