पालघरला पुन्हा भूकंपाचा धक्का; ३.६ तीव्रतेची नोंद

पालघर : मंगेश तावडे

पालघर जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी होती. भूकंपाचे केंद्र २०.०४७ अक्षांश आणि ७२.९७४ रेखांशावर असून, त्याची खोली अवघी पाच किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या घटनेची नोंद ‘Reviewed’ म्हणून केली आहे. कमी खोलीवर झालेल्या या भूकंपामुळे परिसरातील काही भागात सौम्य कंपने जाणवल्याची शक्यता आहे. दरम्यान, या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आलेली नव्हती. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्येही पालघरमध्ये २.७ तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला होता.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button