पालघर :
पालघरमधील केळवे ते धाकटी डहाणू तसेच झाई बोर्डीपर्यंत असलेल्या सागरीतटीय विकासकामांची आढावा बैठक आमदार राजेंद्र गावित, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे, पतन अभियंता सुरेखा पवार, उप अभियंता सावंत, मत्स्य व्यवसाय विकास पालघरचे उपाआयुक्त दिनेश पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता जाधव, पगारे व चव्हाण यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह पालघर येथे झाली. तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्याकडून मंजूर चिंचणी खाडी नाका ते मोरीपाडा समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
वरील विभागामार्फत मंजूर विकास कामे व प्रस्तावित कामे तसेच काही महत्त्वाचे असलेले कामांचा आढावा घेतला. सातपाटी येथील फिशिंग हॅर्बर, वडराई परमहंस आश्रम कडे जाणारा रस्ता, वडराई सुळपाडा समुद्राकडे जाणारा रस्ता, खारेकुरण स्मशानभूमीकडे जाणार रस्ता व नाईकपाडा नाईक मैदान संरक्षक भिंत, एडवण आशापुरा मंदिर येथे वाहन तळ, तारापूर लाल दरवाजा आंबेडकर नगर येथे संरक्षण भिंत, नवापूर-दांडी, केळवे मांगेल आळी ते माहीम टेंभी पर्यंत मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला.
हँमस् अंतर्गत मंजूर काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. तसेच एम.एस.आर.डी.सी.कडे वर्ग करण्यात आलेली कामे एम.एम.बी. व पतन मार्फत करण्याचे सूचित करण्यात आले.
