पालघर | प्रतिनिधी
सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर संचलित सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत नव्याने बांधण्यात आलेल्या ११ सुसज्ज वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ शनिवार, १३ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या नव्या वर्गखोल्यांचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मिलिंद ओगले (सह मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अग्निशमन सेवा) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.ए. सचिन कोरे (अध्यक्ष, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर) हे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालय प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, वाढत्या विद्यार्थीसंख्येला आधुनिक व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
