पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
तालुका पालघर येथील जिल्हा परिषद शाळा कोसबाड, केंद्र नांदगाव यांच्या वतीने चिंगारी शक्ती फाउंडेशन, मुंबई तसेच इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तियारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरजवंत मुलींना २० सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षणासाठी दूरवरून पायी येणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमास चिंगारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक व सीईओ पिंकी राजगरिया, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गोपिका दोशी, दीपक वाधवा, केंद्रप्रमुख जितेंद्र ढोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गवळी व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना पिंकी राजगरिया यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, “मुलींनी शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान मजबूत करावे आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे,” असे सांगितले. शिक्षणामुळेच राष्ट्रनिर्मिती आणि उज्ज्वल भविष्य शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात गोपिका दोशी यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करत, विद्यार्थिनींनी स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा उपक्रमांसाठी मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.
या सायकल वाटपामुळे मुलींना शाळेत येणे सोपे होणार असून, त्यांची उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन जया सुतार यांनी केले, तर आभार प्रदर्शन समिधा पाटील यांनी केले.

जागतिक आरोग्य दिन विशेष ऑफर 🏥 RELIEEF HOSPITALS 💙 फुल बॉडी हेल्थ प्लस पॅकेज 🔬 82+ अत्याधुनिक आरोग्य तपासण्या डायबेटीस • CBC • लिव्हर • किडनी • थायरॉईड • हार्ट प्रोफाइल • व्हिटॅमिन्स • हाडांचे आरोग्य 🎉 स्पेशल ऑफर 💰 ₹6,999 ❌ ✅ फक्त ₹3,999 ✨ प्रिमियम फायदे 🚗 मोफत होम सॅम्पल कलेक्शन 👨⚕️ मोफत डॉक्टर सल्ला 📊 डिजिटल रिपोर्ट्स (मोबाईलवर) 🌟 मुख्य तपासण्या: CBC | Sugar | Cholesterol | LFT | KFT | Thyroid | Vitamin D & B12 | Calcium | Uric Acid | Urine 💡 आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आजच तपासणी करा! 📞 आता लगेच बुक करा! Call / WhatsApp: 91819 99999 ⏳ मर्यादित कालावधी ऑफर – संधी गमावू नका!
Call Now: 9181999999
Visit: https://forms.gle/Dn6KgGgV5PnMLrPu7
…
