पालघर : जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर कोसबाड येथे कार्यरत उपक्रमशील शिक्षिका सौ. समिधा संजय पाटील यांना पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे ध्येय एज्युकेशन अकॅडमी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
समिधा पाटील यांनी आय. एम. विनर स्कॉलरशिप, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळा विकास, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन, तसेच भौतिक सुविधा उभारून शाळेला आयएसओ दर्जा मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, नवभारत साक्षरता अभियान, विद्यार्थी ऑलिंपियाड स्पर्धा आणि टाटा ज्योती फेलोशिप यामध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यापूर्वीही पंचायत समिती वाडा तसेच ‘बी द चेंज फाउंडेशन महाराष्ट्र’ यांच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरवर्षी पाच शाळांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य देणे आणि विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे, ही त्यांची विशेष सामाजिक बांधिलकी आहे.
हा सन्मान विद्यार्थ्यां व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आणखी जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
——————-
🩸✨ रक्तदान शिबिर✨🩸📅 ७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन विशेष⏰ वेळ: सकाळी ९ ते दुपारी ३📍 रिलिफ हॉस्पिटल्स पालघर व बोईसर ❤️ “तुमच्या रक्ताचा एक थेंब कोणाचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो.”🚑 आजचे फक्त १० मिनिट…👉 कोणासाठी तरी संपूर्ण आयुष्य ठरू शकतात!🎁 रक्तदात्यांसाठी विशेष लाभ:💉 १ युनिट मोफत 👨👩👧 कुटुंबासाठी – फक्त ₹५००🪪 डोनर कार्ड – ₹५०० सूट💰 सामान्य शुल्क – ₹१६००📜 सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र🏥 सहकार्य : SMT. D. K. Chheda Blood Bank & Component Centre, Dahanu📞 माहितीसाठी: 9181999999*🙏 कृपया हा मेसेज शेअर करा आणि रक्तदानासाठी प्रेरित करा! ❤️

