विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘Oscillations’ व ‘VNPS 2026’ तांत्रिक महोत्सव उत्साहात

वसई : विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात १ व २ एप्रिल २०२६ रोजी ‘Oscillations 2026’ आणि ‘VNPS 2026’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांचा दिमाखदार महोत्सव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या आंतर-महाविद्यालयीन उपक्रमात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शोधनिबंध व प्रकल्प सादर केले.

१ एप्रिल रोजी आयोजित ‘Oscillations 2026’ अंतर्गत तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा पार पडली, तर २ एप्रिल रोजी ‘VNPS 2026’ अंतर्गत राष्ट्रीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, संशोधनवृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अवकाश व्यवहार कार्यालयाचे डॉ. शिरीष रावण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक तांत्रिक प्रवाहांची माहिती देत संशोधन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.

या महोत्सवाला IEEE, ISA, CSI, NSDC, ISHRAE, IETE, VMEA, CESA आणि IGBC या नामांकित संस्थांचे सहकार्य लाभले. सादर प्रकल्पांचे तज्ज्ञ परीक्षकांकडून काटेकोर मूल्यमापन करण्यात आले.प्राचार्य डॉ. राकेश हिमते व डीन डॉ. विकास गुप्ता यांनी संशोधनाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समारोपावेळी विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक, खजिनदार हसमुखभाई शाह व जॉइंट डायरेक्टर विशाल सावे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. महोत्सवाचे संयोजन डॉ. सतीश साळुंखे यांनी केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button