पालघर : भारतीय जनता पार्टी पालघर मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. सविता (सावी) संतकुमार मल्लाह यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला कार्यकर्त्यांना संघटित करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात पालघर शहराध्यक्ष अॅड. तथा नगरसेवक जयेश आव्हाड, नगरसेवक गटनेते भावानंद संखे, पालघर कामगार जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक व माजी पालघर जिल्हा उपाध्यक्ष अरुण माने, नगरसेविका सौ. मोना मिश्रा, मीडिया प्रमुख गणेश कुडू, हेमंत पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषद/बजरंग दलचे उपाध्यक्ष संतकुमार मल्लाह उपस्थित होते.
यावेळी तेजींदर सिंग, भावेश जैन, जिगर जैन, सौ. गायत्री शर्मा, सौ. राधा रेड्डी आणि सौ. भाग्यश्री सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सविता (सावी) मल्लाह यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त अध्यक्षा सविता (सावी) मल्लाह यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत महिला मोर्चाला अधिक सक्षम करण्यासाठी, महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि पक्षाच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
