पालघरमध्ये चंद्रकात गणवीर यांचे कोका-कोला कंपनीच्या निर्णयाविरोधात निषेध आंदोलन 

पालघर :

“मी स्थानिक, मी मराठी, मी महाराष्ट्रीयन” असा ठाम नारा देत हिंदुस्थान कोका-कोला ब्रेवरेज प्रा. लि. या नामांकित कंपनीतील एका परप्रांतीय अधिकाऱ्याने स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना डीलरशिप हब दिल्याच्या निर्णयाविरोधात चंद्रकात गणवीर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. हा निर्णय स्थानिक युवक व व्यावसायिकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, मोरेकुरण येथे हे आमरण उपोषण सुरू असून स्थानिकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी हा लढा असल्याचे गणवीर यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पात्र उमेदवार उपलब्ध असताना त्यांना डावलून परप्रांतीयांना संधी देणे हा अन्याय असून अशा धोरणांना तत्काळ आळा घालावा, अशी त्यांची मागणी आहे.

या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून कंपनीने आपला निर्णय बदलावा व स्थानिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक, युवक, व्यापारी व सामाजिक संघटनांनी या उपोषणात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकात गणवीर यांनी केले आहे. स्थानिकांच्या हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. श्री. गणवीर यांनी निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असून सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताकीद द्यावी, असेही म्हटले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button