अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनकडून आघवान–शिशुपाडा शाळेला नवी इमारत सुपूर्द

डहाणू : ग्रामीण शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (ADTPS) आणि अदानी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आघवान–शिशुपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला नव्याने बांधलेली शाळा इमारत सुपूर्द करण्यात आली. १५ एप्रिल रोजी झालेल्या समारंभात ही इमारत शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांकडे औपचारिकरीत्या हस्तांतरित करण्यात आली.

शाळेत अपुऱ्या जागेमुळे दोन तुकड्या एकाच वर्गात बसविल्या जात असल्याने अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज भासत होती. ही बाब लक्षात घेऊन ADTPS च्या CSR पथकाने गरज मूल्यांकन करून प्रकल्प अदानी फाउंडेशनकडे सादर केला. त्यानुसार दोन सुसज्ज वर्गखोल्या आणि एक बहुउद्देशीय सभागृह असलेली इमारत उभारण्यात आली.

या प्रसंगी ADTPS चे चीफ बिझनेस ऑफिसर हरीश पांडे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. “शिक्षण हा सामाजिक विकासाचा पाया असून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची बांधिलकी आहे,” असे त्यांनी सांगितले.

नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण मिळणार असून अध्यापन प्रक्रियेतही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button