मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
ग्रामपंचायत नावझे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल आरोग्य तपासणी तसेच औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम जागवू संवेदना सेवाभावी संस्था, मांडे, भक्ती वेदांत ट्रस्ट (मिरा रोड), निरामय फाउंडेशन (वाडा) व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्ष वंदना परशुराम पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वझे गुरुजी, अभय वर्तक, पंकज वर्तक, विक्रम पडके, रोहन राऊत, अशोक सर ग्रामपंचायत नावझे चे सरपंच, सर्व सदस्य ग्राम विकास अधिकारी, गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये 100 पेक्षा जास्त रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली, तर 15 रुग्णांवर यशस्वीपणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच गरजूंना मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले.


या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा त्यांच्या दारापर्यंत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. आयोजक संस्थांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button