भाजपचे कैलास म्हात्रे पराभूत, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची वाताहत, महाविकास आघाडीचा सुपडा साप, एकनाथ शिंदे यांचा करिष्मा चालला
पालघर : मंगेश तावडे
पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उत्तम मोरेश्वर घरात यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत आपल्या 19 शिलेदारांना नगरपरिषदेत प्रवेश दिला. एकूण 30 नगरसेवकपदांपैकी 19 नगरसेवक शिंदे सेना, तर उर्वरित जागांसाठी भाजपा आठ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडे तीन जागा मिळाल्या. नूतन नगराध्यक्ष उत्तम घरत यांना 16,580, भाजपचे कैलास म्हात्रे यांना 11,427 तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार उत्तम पिंपळे यांना 4092 मते मिळाली. त्यापैकी या उमेदवारांव्यतिरिक्त माजी नगरसेवक जावेद लुलानिया, काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रीतम राऊत आणि एडवोकेट राहुल ठाकरे निवडणूक रिंगणात होते. अन्य नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार गटाला एकही खाते खोलता आले नाही. अनेक विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत 5153 मतांनी विजयी झाले.
पालघरमधील नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार
1अ प्रियंका राजेंद्र म्हात्रे (शिवसेना शिंदे), 1 ब अरिफ उस्मान कलाडिया (शिवसेना उबाठा ), 2 अ मोना मिश्रा (भाजपा), 2 ब भारती धोत्रे (भाजपा), 3 अ महेश कोती (शिवसेना शिंदे), 3 ब कृपा प्रवीण मोरे (भाजपा), 4 अ आनंद राऊत (शिवसेना शिंदे), 4 ब प्रीती मोरे (शिवसेना शिंदे), 5 ब पुष्पा जैन (शिवसेना शिंदे), 5 अ राजेंद्र पाटील (शिवसेना शिंदे), 6 अ प्रगती म्हात्रे (भाजपा), 6 ब राईस खान (शिवसेना शिंदे), 7 अ ज्योती जाधव (शिवसेना शिंदे), 7 ब मुनाफ मेमन (भाजपा), 8 अ राधा मानकामे (शिवसेना उबाठा), 8 ब राहुल पाटील (शिवसेना उबाठा), 9 अ मेघा आघाव (शिवसेना शिंदे), 9 ब अमोल पाटील (शिवसेना शिंदे), 10 अ विभूती चंपानेरकर (शिवसेना शिंदे), 10 ब नीलम संखे (शिवसेना शिंदे), 11 अ सोनाली शिंदे (भाजपा), 11 ब भावानंद संखे (भाजपा), 12 अ अमिश पिंपळे (भाजपा), 12 ब उज्ज्वला काळे (शिवसेना शिंदे), 13 अ चंद्रशेखर वडे (शिवसेना शिंदे), 13 ब शिल्पा वाजपेयी (शिवसेना शिंदे), 14 अ दिनेश घरत (शिवसेना शिंदे), 14 ब गीतांजली माने , (शिवसेना शिंदे), 15 अ माधुरी सापाटे (शिवसेना शिंदे), 15 ब जश्विन घरत (शिवसेना शिंदे) यांचा समावेश आहे.
पालघर नगर परिषद निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांनाही पराभवाचा फटका बसला आहे. त्यामध्ये त्यामध्ये स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांच्यासह नगरसेवक अक्षय संखे (भाजप), गीता पिंपळे (भाजप), रोहिणी अंबुरे (भाजप), हिंदवी पाटील (भाजप),
अलका राजपूत (भाजप), अनुजा तरे (उद्धव सेना), प्रथमेश पिंपळे (उद्धव सेना), रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील (शिंदे सेना) यांचा समावेश आहे. यामध्ये पराभूत उमेदवारांमध्ये जास्त संख्या भाजपची असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच काही माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांची पराभूत होण्यात समावेश आहे.
पालघरच्या जनतेने पुन्हा स्वीकारले
पालघरमधील नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये
प्रियंका राजेंद्र म्हात्रे (शिवसेना शिंदे), मोना मिश्रा (भाजपा), महेश कोती (शिवसेना शिंदे), राजेंद्र पाटील (शिवसेना शिंदे), राधा मानकामे (शिवसेना उबाठा), अमोल पाटील (शिवसेना शिंदे), भावानंद संखे (भाजपा), उज्ज्वला काळे (शिवसेना शिंदे), चंद्रशेखर वडे (शिवसेना शिंदे), शिल्पा वाजपेयी (शिवसेना शिंदे), रईस खान (शिवसेना शिंदे), मुनाफ मेमन (भाजपा), दिनेश घरत (शिवसेना शिंदे) यांना पालघरच्या जनतेने दुसऱ्यांदा स्वीकारले आहे.
नगर परिषदेत पहिल्यांदाच …
अरिफ उस्मान कलाडिया (शिवसेना उबाठा ), भारती धोत्रे (भाजपा), कृपा प्रवीण मोरे (भाजपा), आनंद राऊत (शिवसेना शिंदे), प्रीती मोरे (शिवसेना शिंदे), पुष्पा जैन (शिवसेना शिंदे), प्रगती म्हात्रे (भाजपा), ज्योती जाधव (शिवसेना शिंदे), राहुल पाटील (शिवसेना उबाठा), मेघा आघाव (शिवसेना शिंदे), विभूती चंपानेरकर (शिवसेना शिंदे), नीलम संखे (शिवसेना शिंदे), सोनाली शिंदे (भाजपा), अमिश पिंपळे (भाजपा), गीतांजली माने (शिवसेना शिंदे), माधुरी सापटे (शिवसेना शिंदे), जश्विन घरत (शिवसेना शिंदे) यांचा समावेश आहे.
