पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंतीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष उपक्रम राबविण्यात आला. गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या ‘राजा शिवछत्रपती परिवार’ पालघर विभागातर्फे आयोजित किल्ले भवानगड स्वच्छता मोहिमेत श्रमदान करणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्रमेश बेटकर यांच्या सहकार्याने अन्नदान वाटप करण्यात आले. कार्यक्रमास राजा शिवछत्रपती पालघर विभागाचे प्रमुख उमेश दादा पयेर तसेच उपविभाग प्रमुख उत्तम दादा रावते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

