पालघर : अब्याकस टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल अब्याकस स्पर्धेमध्ये पालघर येथील पीडी चॅम्प्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अवघ्या १० मिनिटांत १०० ते १५० गणिती प्रश्न अचूक आणि वेगाने सोडवून आपल्या मानसिक गणनशक्तीचा उत्कृष्ट आविष्कार घडविला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वेग, अचूकता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती या निकषांवर करण्यात आले.
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे यश मिळविले आहे – शौर्य राऊत – चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स, आराध्या पटेल – टॉपर, सबूर मुल्लाजी – टॉपर, उर्वी घरत – चॅम्पियन, राम राऊत – चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स, अभिजीत शाह – चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स, मिष्टी पाटील – चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अशी नावे आहेत.
पीडी चॅम्प्स अकॅडमी ही संस्था विद्यार्थ्यांच्या मेंदूचा सर्वांगीण विकास, मानसिक गणितातील प्रावीण्य, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, तार्किक विचारशक्ती तसेच अभ्यासातील वेग आणि अचूकता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. अबॅकस प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढतो. याशिवाय विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक असलेला मजबूत पाया देखील तयार होतो.
या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमीच्या संस्थापक संचालिका सौ. प्रमिला दहिफळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विद्यार्थी अधिकाधिक यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सांगितले, “आजचे अबॅकस प्रशिक्षण म्हणजे उद्याच्या उज्ज्वल, आत्मविश्वासू आणि बुद्धिमान पिढीची भक्कम पायाभरणी असल्याचे सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९५१८९७३४२१.
