मुंबई : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे चिटणीस चंद्रकांत लक्ष्मण तावडे (गाव – वाल्ये) यांचे हृदय शस्त्रक्रियेदरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने मंडळाने एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. त्यांचे सामाजिक कार्य, सेवाभाव आणि नम्र व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने तावडे समाजावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबई यांनी व्यक्त केली आहे.
वाल्येच्या चंद्रकांत तावडे यांचे निधन
