१६ वर्षांनंतर न्यायाचा ठाव!
पालघर: राजतंत्र वृत्तसेवा
नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल सन २००९ मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दाम्पत्याला तब्बल १६ वर्षांनंतर अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष–३, विरार यांना मोठे यश मिळाले आहे.
इस्टेट एजंट विनोद जयस्वाल यांच्या खुनाप्रकरणी दलालीच्या वादातून ही हत्या झाली होती. गुन्ह्यानंतर आरोपी लपून राहत होते. मात्र मागील सहा महिन्यांच्या कौशल्यपूर्ण तपासानंतर धर्मेंद्र सोनी व किरण सोनी या आरोपी दाम्पत्याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २२ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
जुन्या गुन्ह्यांनाही न्याय मिळवून देणारी पोलिसांची जिद्द कौतुकास्पद! 👮♂️👏
