प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतून युवकांना करिअरची सुवर्णसंधी

पालघर : देशातील युवकांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) तिसऱ्या टप्प्यात सुरू असून, पात्र उमेदवारांसाठी करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा सुमारे ₹९,००० स्टायपेंड मिळणार आहे. पालघर जिल्ह्यात Reliance Industries Limited, HDFC Bank Limited आणि GAIL (India) Limited यांसारख्या कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहेत.

१८ ते २५ वयोगटातील शिक्षण पूर्ण केलेले व सध्या नोकरीत नसलेले युवक पात्र ठरणार आहेत. इच्छुकांनी https://pminternship.mca.gov.in⁠� येथे नोंदणी करून अर्ज करावा. युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button