पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नावझे येथे वनराई बंधारे बांधण्यात आले. पालघर तालुक्यातील नावझे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत नावझे हद्दीत वनराई बंधारे बांधण्यात आले.

या उपक्रमात वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यास मदत होणार असून शेती, पिण्याचे पाणी व पर्यावरण संतुलनासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 च्या उद्दिष्टांनुसार जलसंधारण, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासासाठी ग्रामपंचायत नावझे सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या उपक्रम साठी नावझे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ,गावातील सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत ,गट अंगणवाडी कार्यकर्ते, अशा, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी,ग्रामस्थ तसेच मुंबई येथील पाटूकगाला कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
