सफाळेमध्ये राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन

सफाळेमध्ये राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन

पालघर : 

क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर आणि जिल्हा क्रीडा परिषद ,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे येथे राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या बेसबॉल स्पर्धा २६, २७, २८ डिसेंबर 2025 या कालावधीत सफाळे येथील डॉक्टर पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेच्या मैदानावर पार पडणार आहेत. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांचे आठ तर मुलींचे आठ असे १६ बेसबॉल संघ सहभागी होणार आहेत. बेसबॉल हा खेळ प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा तर आशिया खंडात जपान व दक्षिण कोरिया या देशात खेळला जातो. भारतात बेसबॉल या खेळाची सुरवात मणिपूर राज्यातून झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात मणिपूर येथे आलेल्या अमेरिकन लष्कराकडून या खेळाची ओळख झाली.

भारतात मणिपूर, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात तसेच पंजाब या राज्यात प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने पालघर सारख्या ग्रामीण भागात बेसबॉल या खेळाची ओळख होईल आणि तरुणांना बेसबॉल खेळात रस निर्माण होऊन ग्रामीण भागात बेसबॉल खेळाचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी तरुणांनी आपल्या जिल्ह्यासाठी नवीन असलेला हा खेळ पाहण्यासाठी यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे..

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button