घोणसई ग्रामपंचायतीने बांधला बंधारा 

वाडा/प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व पेसा दिनाचे औचित्य साधून घोणसई ग्रामपंचायतीने आज येथील नाल्यावर ग्रामस्थांच्या सहभागातून बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचा वापर केला.

या बंधाऱ्यामुळे वाया जाणारे पाणी भूगर्भात जिरविण्यास मदत होणार असून जनावरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी मातीचा बंधारा बांधून शेतीलाही पाणी पुरवठा होणार आहे. भातशेतीनंतर येथील शेतकरी कडधान्य व भाजीपाल्याची शेती करतात या बंधांऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.विहीरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

यावेळी घोणसई मेट ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर, उपसरपंच विशाल पाटील, ग्रामविकास अधिकारी तेजस भुजबळ सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी अंगणवाडी सेविका बचत गटासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button