भावना मीणाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सफाळे : २४ डिसेंबर सफाळे येथील कुमारी भावना दर्गाराम हिची शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी १७ वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धा दिनांक २४ डिसेंबर २०२५ पासून कोकमठाण शिर्डी येथे होणार आहेत.

कुमारी भावना ही सफाळे येथील राजगुरु ह. म.पंडित विद्यालयाची विद्यार्थिनी असून इयत्ता १० वीत शिकत आहे. कुमारी भावना हिच्या कामगिरीत प्रशिक्षक विशाल पाटील, क्रीडा शिक्षक रमाकांत घरत, अनिल वझे आणि शालेय व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button