मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत माहीम ग्रामपंचायत हद्दीतील तिघरे पाडा येथे वनराई बंधार्याचे काम करण्यात आले. माहीम ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रीती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री नवनाथ थेटे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व तिघरे पाडा ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. श्रमदानातून झालेल्या बंधार्याच्या कामाबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले.
