पालघर : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल जाहीर करत विविध विभागांसाठी ‘विभागीय प्रसिद्धी प्रमुख’ पदांवर नव्या नियुक्त्या केल्या आहेत. या फेरबदलात पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते समीर पाटील यांची निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे.
कोकणचे सतिश धारप (रायगड, पनवेल), दिपेश म्हात्रे (ठाणे), श्रीमती कल्पना नालस्कर (पूर्व विदर्भ), अन्नु शर्मा (पश्चिम विदर्भ), गोविंद बोरसे (उत्तर महाराष्ट्र), संजय मयेकर (पश्चिम महाराष्ट्र) यांची निवड प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या आदेशानुसार समीर पाटील यांच्यावर पालघर विभागाच्या प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर सातत्याने सक्रिय राहून पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
समीर पाटील हे पालघरमध्ये पक्षाचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांनी सहभाग नोंदवत जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीकडे पक्षांतर्गत विश्वासाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.
या नियुक्त्यांमुळे भाजपच्या संघटनात्मक बळकटीला चालना मिळणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, समीर पाटील यांच्या निवडीमुळे पालघरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
