पालघरमध्ये रविवारी सिंधुरत्न मित्र मंडळातर्फे विशेष योग शिबिराचे आयोजन

पालघर : सिंधुरत्न मित्र मंडळ, पालघर यांच्या वतीने सावंतवाडीचे प्रख्यात योग गुरु विकास गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या रविवारी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली २० वर्षे योग प्रशिक्षण देणारे गोवेकर सध्या पालघर येथे दाखल झाले असून नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

या शिबिराची वेळ रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ६.०० ते ७.३० अशी निश्चित करण्यात आली असून स्थळ बाळासाहेब ठाकरे उद्यान, भगिनी समाज समोर, पालघर असे आहे. सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होताना योगा मॅट किंवा चटई सोबत आणण्याचेही सांगण्यात आले आहे.

योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होतो, शरीर लवचिक राहते आणि मानसिक शांतता प्राप्त होते. त्यामुळे निरोगी आणि सकारात्मक आयुष्यासाठी योगाचा अंगीकार करणे काळाची गरज बनली आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button