वसईत लाच प्रकरणात कारवाई; ७ लाखांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसम ताब्यात

वसई / नालासोपारा : रुपेश नारगोळकर

अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत एका खासगी इसमाला रंगेहाथ ताब्यात घेतले. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वसई येथील अपर तहसिलदार (अकृषक) कार्यालयात बाह्य कर्मचारी म्हणून काम करणारे अनिल प्रभाकर चौबल यांनी तक्रारदाराच्या मौजे देपिवली (ता. वसई, जि. पालघर) येथील जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच संबंधित जागा एन.ए. (नॉन-अ‍ॅग्रिकल्चर) करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून ४० लाख रुपयांची अतिरिक्त मागणीही करण्यात आल्याचे समोर आले.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) कारवाईदरम्यान अनिल चौबल यांनी ७ लाख रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्यांना दुपारी १.१३ वाजता रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात अन्य संबंधित अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील तपास सुरू आहे. ACB कडून भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button