“धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच” हा संदेश कृतीतून दिला.
पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर शहर आज एका सुंदर आणि भावनिक प्रसंगाचा साक्षीदार ठरले. राम नवमीच्या पावन निमित्ताने राम मंदिर ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत धार्मिकतेसोबतच मानवतेचा अनमोल संदेशही झळकला.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम समाजाने पुढाकार घेत, सर्व रामभक्तांचे मनापासून स्वागत केले. पुष्पवर्षाव करत त्यांनी आपुलकी, प्रेम आणि सन्मानाची भावना व्यक्त केली. केवळ स्वागतच नव्हे, तर रामभक्तांसाठी पाण्याचीही उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या छोट्याशा पण मनाला भिडणाऱ्या सेवेतून खरी मानवता दिसून आली.राम लल्लाला हार अर्पण करून मुस्लिम बांधवांनी आदरपूर्वक नतमस्तक होत, “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच” हा संदेश कृतीतून दिला. या प्रसंगाने उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला.फरीद लुलानिया, बशीर शेख, इलयास काझमी, आरिफ कलाडिया, मोहसिन खान, सुल्तान शेख, अमजद शेख, इरफान खान यांसह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हा क्षण केवळ एक सोहळा नव्हता, तर हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुता आणि परस्पर सन्मान यांचे जिवंत उदाहरण ठरला. अशा प्रसंगांमुळे समाजात प्रेम, सलोखा आणि एकतेची भावना अधिक दृढ होत असून, संपूर्ण जगासाठी एक सकारात्मक संदेश दिला जात आहे.
