पालघर :
क्षयरोग निर्मूलनाच्या लढ्याला अधिक गती देत २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच वेळी जिल्ह्यात TB मुक्त भारत अभियान २.० ची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. योगेश सुरळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख, तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी व डॉ. कल्पना उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. सूर्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे क्षयरोगाविषयीचे गैरसमज दूर करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कांचन गृह उद्योग व हर्षी इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना पोषणमूल्यांनी समृद्ध फूड बास्केटचे वितरण करण्यात आले. तसेच उपचार पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या टीबी चॅम्पियन्स यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी लवकर निदान, नियमित उपचार आणि समाजाची सामूहिक जबाबदारी या त्रिसूत्रीवर भर देत, “क्षयरोगमुक्त भारत” साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा समन्वयक मनोज सर, PPSA जिल्हा कॉर्डिनेटर विशाल सर व त्यांची टीम, तसेच ग्रामीण रुग्णालय पालघर येथील कर्मचारी व STS/STLS यांनी मोलाचे योगदान दिले.
जागतिक क्षयरोग दिन : इतिहास व संदेश
२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस या जीवाणूचा शोध लावून वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला. या दिवसाचे स्मरण ठेवत दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो, जेणेकरून समाजात जागरूकता निर्माण होऊन या आजाराचे निर्मूलन साध्य होईल.
क्षयरोग : ओळख आणि धोका
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र, हाडे, मेंदू, ग्रंथी, मूत्रपिंड, त्वचा आदी अवयवांनाही तो बाधित करू शकतो. वेळेत उपचार न केल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला
संध्याकाळी ताप व रात्री घाम येणे
भूक कमी होणे, वजन घटणे
थुंकीत रक्त किंवा छातीत वेदना
सतत थकवा किंवा मानेला गाठी
तपासण्या व उपचार – सर्व काही मोफत
थुंकी तपासणी
CB-NAAT / TruNat चाचणी
छातीचा एक्स-रे
आवश्यकतेनुसार इतर तपासण्या सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
“क्षयरोग हरवायचा असेल, तर वेळेत तपासणी आणि पूर्ण उपचार हाच एकमेव मार्ग!” क्षयरोगमुक्त भारतासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.– जिल्हा क्षयरोग केंद्र, पालघर
Advt……
1) Sai Ashirvad Complex, C Wing, Ground Floor, Tata Showroom समोर, Sundaram Naka, Mahim Road, Palghar, 📐 Area: 850 sq.ft.
🔹 2) HDIL, Bidco Naka जवळ, 17 No. Building, First Floor, Palghar, 📐 Area: 870 sq.ft.
✨ सर्व फ्लॅट्स योग्य (reasonable) दरात उपलब्ध आहेत.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Farid Lulania 📱 9890560786.
