नवनियुक्त शिक्षकांनी घेतली प्रदीप वाघ यांची भेट

मोखाडा : सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील खोडाळा भागातील पेसा भरती अंतर्गत नव्याने रुजू झालेले शिक्षकांचे शिष्टमंडळाने आज आदिवासी समाजासाठी लढा देणाऱे आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांची आज सदिच्छा भेट घेतली.या मध्ये श्याम फसाळे, हनुमंत सप्रे, कृष्णा गोलवड, सुरेश शिंदे,हर्षदा खादे, किशोर झडे, अशोक पाटील यांनी सांगितले की,अनेक वर्षांपासून लढा दिल्या नंतर द अखेर न्याय मिळाला असून पेसा भरती मध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.


पेसा भरती कर्मचारी लढा मध्ये आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष व पंचायत समिती माजी सभापती प्रदीप वाघ यांनी कायम आवाज उठवला होता. मुंबई, नाशिक, पालघर विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात प्रदीप वाघ यांनी सातत्याने सहभाग घेतला होता, तसेच आंदोलनास पाठिंबा दिला होता, मंत्रालय आणि जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालया कडे सातत्याने पाठपुरावा करणारे आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी म्हणून प्रदीप वाघ यांचे सर्व नवनियुक्त शिक्षकांनी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.


या वेळी सर्व शिक्षकांचे वाघ यांनी अभिनंदन केले, तसेच तालुक्यातील शिक्षणाचे ज्ञान दानाचे कार्य अधिक प्रभावीपणे करा अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश झुगरे, सविता वाघ उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button