मुंबई : अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळातर्फे भजन संस्कृतीचा जागर करणारी भव्य संगीत रजनी आयोजित करण्यात आली आहे. कोकणच्या लाल मातीतील सुगंध, भक्तीचा गंध आणि संगीताचा नाद यांचा संगम असलेला हा सांगीतिक सोहळा रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भांडुप (पश्चिम) येथील कोकण नगर व्यायामशाळा हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या संगीत रजनीत नामवंत भजनी कलाकार आपल्या सादरीकरणातून भक्तीरसाची अनुभूती देणार असून, कोकण-भजन परंपरेचे वैभव प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कोकण-भजन संस्कृती जपण्याच्या आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांनी व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
