जव्हार नगरपरिषदेवर कमळ फुलले


नगराध्यक्षांसह 14 नगरसेवकांवर भाजपची एकहाती सत्ता

जव्हार : राजतंत्र वृत्तसेवा
जव्हार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडली होती. त्यानंतर तब्बल 19 दिवसांनी रविवारी सकाळी 10 वाजेपासून आदिवासी विकास भवन, हल्लीचे नगरपरिषद कार्यालय येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या लोकशाहीच्या उत्सवात भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत जव्हार नगरपरिषदेवर आपले कमळ फुलवले असून नगराध्यक्ष पदासह 20 पैकी 14 नगरसेवक निवडून आणत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे.


या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित होते. त्यानुसार भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा कुणाल उदावंत यांनी 3,865 मते मिळवत 1,653 मताधिक्याने विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मीन मणियार यांना 2,212 मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) युतीच्या उमेदवार पद्मा रजपूत यांना 1,479 मते मिळाली.


2017 च्या पंचवार्षिक नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला होता. मात्र यंदा भाजपने मोठी झेप घेत पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, ज्योती भोये, सुरेखा तेथले, संतोष चोथे, प्रमोद कोठेकर तसेच ठाणा बँक व आदिवासी विकास महामंडळाचे संचालक दिलीप पटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ताकद पणाला लावत नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष व स्पष्ट बहुमत मिळवून दाखवले.

पक्षनिहाय निकाल
भारतीय जनता पार्टी : 14 नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) : 3 नगरसेवक
शिवसेना (शिंदे गट) : 2 नगरसेवक
महाविकास आघाडी : 1 नगरसेवक
प्रभागनिहाय विजयी नगरसेवक
प्रभाग 1:
नकुल दिलीप पटेकर (भाजपा), पद्मा गणेश रजपूत (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 2:
हितेश जाधव (भाजपा), पूजा खोरगडे (भाजपा)
प्रभाग 3:
अमोल दिनकर बर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), आफरीन मतीन शेख (भाजपा)
प्रभाग 4:
कुणाल प्रदीप उदावंत (भाजपा), आश्विनी लतेश चव्हाण (महाविकास आघाडी)
प्रभाग 5:
कमल कमलाकर कुवरे, इमरान मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग 6:
स्वप्निल औसरकर, स्नेहा घाटाळ (भाजपा)
प्रभाग 7:
अनंता गरेल (भाजपा), नसीमा मेमन (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 8:
सचिन सटानेकर, मनीषा वड (भाजपा)
प्रभाग 9:
संगीता मुकणे, कुशील सहाणे (भाजपा)
प्रभाग 10:
दर्शन तामोरे, रुचिका वाजे (भाजपा)

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button