पालघरमधील ब्रेव्हरेज व्यापार्‍यांच्या बैठकीत अनेक ठराव

डीलरशिपवर चर्चा, संबंधित कंपनीच्या विरोधात उठाव करणार असल्याचे मत


पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
पालघरमधील ब्रेव्हरेज व्यापार्‍यांची बैठक साहिल एंटरप्राइजेसमध्ये घेण्यात आली. बैठक जुबेर भाई (फॉर्म फ्रेश) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील ब्रेव्हरेज व्यवसायिकाना येणार्‍या समस्यावर चर्चा करण्यात आली. तसेच पालघर येथील एका शीतपेय बनविणार्‍या कंपनीमार्फत देण्यात येणार्‍या डीलरशिपवर चर्चा करण्यात आली.

या आधी मराठी व्यक्तीची डिलरशिप होती. परंतु, कंपनीचे परप्रांतीय अधिकारी इथे मराठी व्यक्ती डीलर शिपकरिता इच्छुक व कंपनीच्या सर्व नियम व अटीमध्ये असून व स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांचे शिफारस पत्र असताना सुद्धा कंपनीच्या परप्रांतीय अधिकार्‍यांनी बाहेरच्या व्यक्तीस डीलरशिप दिली म्हणून सर्वांनी याचा निषेध केला व ही बाब आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून द्यावी, असा ठराव घेण्यात आला. पालघर जिल्ह्यातील डीलरशिप फक्त आणि फक्त मराठी व्यक्तीलाच मिळावी अन्यथा आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असेही ठरवण्यात आले.

या विषयी जिल्हाधिकारी याना सुद्धा या विषयी निवेदन देण्यात येईल, असे ठरले व असोसिएशनची नोंदणी करण्यात येईल व संपूर्ण जिल्ह्यातील ब्रेवरेज व्यापारास यात सभासदत्व दिले जाईल. याची जबाबदारी चंद्रकांत गणवीर यांना देण्यात आली. असोसिएशनची कार्यकारिणी पुढील बैठकीत निवडण्यात येईल.


बैठकीत खालील व्यापारी उपस्थित होते. शशी गुप्ता, भाष्कर अहिरे, कृष्णा सिंग, विजय यादव, इम्रान आमेर शेख, संदीप झवर, अजय मिश्रा, व्हिन्सी डिसिल्वा, अभिषेक सिंग, जाहेद शेख, राज गुप्ता, यश गुप्ता, फारुक शेख, हीरालाल भाटी, उमेश भोईर, प्रमोद घरत, देवा, राजू जैन, तोफिक शेख, गुलाब सिग, आर. के. रेहान खान, अस्लम भाई, कैलास वरील सर्व व्यापारी उपस्थित होते. शेवटी चंद्रकांत गणवीर यांनी सर्वाचे आभार मानले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button