वोक्हार्ट हॉस्पिटल्सने गरजू मुलांसोबत साजरा केला ख्रिसमस


या उपक्रमाअंतर्गत वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या टीमने मीरा-भाईंदर येथील अंकुर चिल्ड्रन्स होमला भेट दिली. हा आश्रम रस्त्यावर व झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या मुलांसाठी सुरक्षित निवारा पुरवतो. येथे सुमारे 30 मुलांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले आणि त्यांच्यासोबत ख्रिसमसचा आनंद उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, मुलांना आपुलकी, प्रेम आणि भावनिक आधार देण्याचा एक संवेदनशील प्रयत्न ठरला.


यासोबतच या सामुदायिक कार्यक्रमादरम्यान हात स्वच्छतेविषयी जनजागृती सत्रे घेण्यात आली तसेच सोप्या फिजिओथेरपी व्यायामांचे प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून लाभार्थ्यांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकूण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल.


या प्रसंगी वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती झहाबिया खोराकीवाला म्हणाल्या,
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी ही करुणा आणि दीर्घकालीन सामुदायिक सहभागातून प्रेरित आहे. ‘बी अ सांता’ उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ज्यांना सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत काळजी, सन्मान आणि आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आरोग्यसेवा संस्था या संवेदनशील आणि समावेशक समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असा आमचा ठाम विश्वास आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडचे सेंटर हेड डॉ. सुशील कुमार यांनी सांगितले, सणासुदीच्या काळात विविध ठिकाणी समुदायांशी थेट संवाद साधत आम्ही आमची सामाजिक जबाबदारी अधिक बळकट करतो आणि रुग्णालयाच्या भिंतीपलीकडे सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो.


‘बी अ सांता ’सारख्या उपक्रमांद्वारे वोक्हार्ट हॉस्पिटल्स समाजाप्रतीची आपली जबाबदारी संस्थेच्या मूल्यांमध्ये अधिक दृढपणे रुजवत असून, समुदायाशी विश्वासाचे नाते मजबूत करत दीर्घकालीन सामाजिक कल्याणासाठी भरीव योगदान देत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button