पालघर :
रोटरॅक्ट क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने रविवार, 18 जानेवारी 2026 रोजी पालघर येथे सायकलाथॉन 3.0 या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7:30 वाजता झाली. हा कार्यक्रम अध्यक्ष रोट्रॅक्ट. गार्गी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून रोट्रॅक्ट. सानू पासवान यांनी प्रकल्प अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सहभागींस मार्गदर्शन करत सामाजिक जबाबदारी, शारीरिक तंदुरुस्ती आणि समाजाच्या सर्वांगीण आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला.
सायकलाथॉन 3.0 आयोजनामागील मुख्य उद्देश ‘अॅनिमिया मुक्त भारत’ या मोहिमेबाबत जनजागृती करणे हा होता. सायकलिंगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत अॅनिमियामुक्त समाज घडवण्याचा हा प्रयत्न होता. सायकलाथॉनसाठी झुडिओ येथून सुरू होणारे तीन मार्ग निश्चित करण्यात आले होते:
या कार्यक्रमात एकूण 100 सहभागी सहभागी झाले होते. डहाणू, विरार, सफाळे तसेच पालघर येथील सायकलप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली आणि तंदुरुस्ती, एकात्मता, सामाजिक जाणीव तसेच ‘अॅनिमिया मुक्त भारत’ या संकल्पनेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
