अखिल मुंबई उत्कृष्ट भजन स्पर्धेचा अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा भांडुप येथे होणार

मुंबई : विजय क्रीडा मंडळ, भांडुप यांच्या सौजन्याने आयोजित “अखिल मुंबई उत्कृष्ट भजन स्पर्धा २०२५” चा अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी भांडुप (प.) येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. भजन परंपरेला चालना देण्यासाठी आणि नवोदित भजन मंडळांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या भजन मंडळांमध्ये सायंकाळी ६.४५ वा. श्री कोळंबादेव प्रा. भजन मंडळ, भांडुप (भजन गायक – श्री. राकेश तेली), ७.३० वा. श्री. सातेरी रवळनाथ प्रा. भजन मंडळ, भांडुप (भजन गायक – श्री. रोहन कासले) तसेच ८.१५ वा. श्री. देव मालोबा महिला भजन मंडळ, भांडुप (भजन गायिका – श्रीमती भारती पाळेकर) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात भजन स्पर्धेतील विजेत्या व सहभागी भजन मंडळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धक भजन मंडळे आणि भजन गायकांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धक भजन मंडळांमध्ये श्री. देव गांगेश्वर प्रा. भजन मंडळ, दिवा; श्री. महापुरुष प्रा. भजन मंडळ, सांताक्रूझ (पु.); सोमजाई प्रा. भजन मंडळ, भांडुप; गांगेश्वर आरेश्वर प्रा. भजन मंडळ, भांडुप; श्री. भावई प्रा. भजन मंडळ, दिवा; देव भूतनाथ प्रा. भजन मंडळ, डोंबिवली यांचा समावेश आहे.

कार्यक्रमात उत्कृष्ट भजन गायिका – कु. आर्या घाडी, उत्कृष्ट पखवाजवादक – श्री. अमेय गावकर आणि उत्कृष्ट चक्कीवादक – श्री. सखाराम तांबे यांना विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

हा सोहळा कोकण मित्र मंडळ पटांगण, व्यायाम शाळेजवळ, कोकण नगर, भांडुप (प.) येथे आयोजित करण्यात आला असून भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजय क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button