महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठोस आणि प्रेरणादायी पाऊल उचलत रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 तर्फे मुंबई आणि पालघर जिल्ह्यात लवकरच १,००० पिंक ऑटो रिक्षा रस्त्यावर धावणार आहेत.
या उपक्रमांतर्गत १,००० महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार असून, ऑटो रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाची सुरुवात मुंबई – मुलुंड येथे १० पिंक ऑटो रिक्षांच्या वाटपाने करण्यात आली. हा सोहळा

रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष फ्रान्सिसको अरेझु आणि

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी यांच्या शुभ हस्ते पार पडला.

या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार :

मोफत ऑटो ड्रायव्हिंग ट्रेनिंग

लायसन्स, बिल्ला व परमिट मिळवण्यासाठी मदत

सवलतीच्या दरात ऑटो रिक्षा

कर्जासाठी विशेष सहाय्य

डाउन पेमेंटची व्यवस्था.

पात्रता निकष —

किमान ७ वी उत्तीर्ण

महाराष्ट्रात किमान १५ वर्ष वास्तव्य

आधार कार्ड

पॅन कार्ड

राष्ट्रीयीकृत बँकेत खाते

कोणताही पोलीस रेकॉर्ड नसणे (घरगुती / गुन्हेगारी प्रकार)

रोटरी पिंक ऑटो म्हणजे —
महिलांच्या

स्वाभिमानाची

सुरक्षिततेची

आणि स्वावलंबनाची ओळख…


महिलांसाठी विशेष आवाहन
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणतीही महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा ठेवत असेल, तर आजच संपर्क साधा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी आवाहन रोटरीचे जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी केले आहे.
संपर्क: रो. भगवान पाटील : 9922959355 रो. राजेश सामंत : 9823666776
