पालघर :
2 डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ पार पडली आहे. त्याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणु, जव्हार, वाडा या ४ नगरपरिषद/नगरपंचायत यांची निवडणुका प्रक्रिया पार पडली असून दिनांक २१ डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतर मतपेट्या ह्या स्ट्राँगरूम ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सुरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत.

पालघर, डहाणू, जव्हार, वाडा येथील नगरपरिषद/नगरपंचायत अंतर्गत मतदान झालेनंतर सर्व मतपेट्या अनुक्रमे नगर परिषद कार्यालय, पालघर, बी.एस.एस. हॉल, डहाणु, नगरपरिषद कार्यालय, जव्हार व जिल्हा परिषद मराठी शाळा, वाडा या ठिकाणी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
सदर चारही स्ट्राँगरूम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून सदर ठिकाणी पालघर पोलीस दलाकडून एकूण ८ पोलीस अधिकारी व ३६ पोलीस अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे २ अधिकारी व ४८ अंमलदार यांचा २४ तास कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
