कोकण मराठी साहित्य परिषद सल्लागार समितीवर डॉ. ज्योती ठाकरे यांची निवड

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

कोकण मराठी साहित्य परिषद या राज्यातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित साहित्य संस्थेच्या सल्लागार समितीवर शिवसेनेच्या उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. ज्योती ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत महाडच्या शोभाताई सावंत आणि पनवेलचे रामशेठ ठाकूर यांचाही समावेश आहे.कोकण मराठी साहित्य परिषदेतील एक गुणी कार्यकर्ती म्हणून सुरुवात करून सल्लागार समिती सदस्यपदापर्यंतची उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या डॉ. ज्योती ठाकरे यांना यापूर्वी “उत्कृष्ट ग्रामीण लेखिका” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले असून “मध्यावर” हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.त्यांनी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथे पार पडलेले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन विशेष गाजले होते. उत्तम वक्त्या, व्याख्याता, कवयित्री आणि सुसंवादिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ठाकरे या समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य,

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button