रिलीफ हॉस्पिटलच्या माध्यमातून World Health Day निमित्त मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पालघर व बोईसर येथे ‘One Health – एक भविष्य’ या संकल्पनेचा संदेश देत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य हे केवळ वैयक्तिक नसून ते माणूस, प्राणी आणि पर्यावरण यांच्याशी घट्ट जोडलेले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे.

या उपक्रमाद्वारे नागरिकांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. “आपले एक रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते,” असा संदेश देत समाजहितासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

तज्ज्ञांच्या मते, रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णांना मदत होत नाही, तर रक्तदात्यालाही त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतात. नियमित रक्तदानामुळे रक्तप्रवाह सुधारतो, शरीरातील आयर्नचे संतुलन राखले जाते तसेच हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

📍 शिबिराचे स्थळ :

रिलीफ हॉस्पिटल, पालघर आणि रिलीफ हॉस्पिटल, बोईसर, तारीख : 7 एप्रिल 2026 (जागतिक आरोग्य दिन)⏰ वेळ : सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 हे रक्तदान शिबिर एस.एम.टी. डी. के. छेडा ब्लड बँक अँड कंपोनंट सेंटर, डहाणू यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी “विज्ञानासोबत उभे रहा, एकमेकांसाठी उभे रहा” हा संदेश देत नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button