मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ८६५ कर्मचाऱ्यांची उपलब्धता

मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ८६५ कर्मचाऱ्यांची उपलब्धता

तालुकानिहाय कर्मचाऱ्यांचे वाटप

पालघर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थापनाला वेग आला असून, विविध तालुक्यातील कर्मचारी वृंदाची सविस्तर माहिती मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. तालुकानिहाय कर्मचाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

मिरा–भाईंदर महानगरपालिकासाठी निवडणूक कामकाजासाठी डहाणू : १,८७२ कर्मचारी, विक्रमगड : १,११५ कर्मचारी, असे एकूण २,८९७ कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वसई–विरार शहर महानगरपालिकासाठी सर्वाधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले असून, पालघर : २,७१२, वसई : १,२७३, तलासरी : १,०२३, जव्हार : १,१३१, मोखाडा : ६७२ असा एकूण ६,८११ कर्मचारी तपशील महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

तसेच भिवंडी–निजामपूर शहर महानगरपालिकासाठी 

वाडा तालुक्यासाठी १,१५७ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, वसई–विरार शहर महानगरपालिकेकडून वरीलप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या तालुक्यांखेरीज इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांबाबत यापूर्वी कोणतेही आदेश काढले असतील, तर ते तत्काळ रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे दुबार आदेश, किंवा प्रशासकीय अडचणी टाळता येणार असून निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

एकूणच, १०,८६५ कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे मिरा–भाईंदर, वसई–विरार व भिवंडी–निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, आणि काटेकोरपणे पार पाडण्यासाठी मदत मिळणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button