मुंबई, दि. २४ : पालघर जिल्ह्यातील नायगाव (टिवरी) येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी संबंधित फेरफार रद्द करून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणाबाबत सदस्य विलास तरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य प्रशांत बंब, वरुण सरदेसाई यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात काही आरोपींना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती. मात्र, ही पॉवर ऑफ अटर्नी दिल्यानंतर अवघ्या सात दिवसांत ती रद्द करण्यात आली होती. तथापि, रद्द झालेल्या पॉवर ऑफ अटर्नीचाच आधार घेत काही व्यक्तींनी जमीन व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत स्वतःलाच अधिकार देत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचे प्रकारही समोर आले. शासनाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तत्काळ कारवाई करत संबंधित जमिनीवरील फेरफार (म्युटेशन) रद्द करण्यात आले असून मूळ मालकांची नावे पुन्हा नोंदवण्यात आली आहेत. या प्रकरणातील तक्रारदार आणि संबंधित पक्षकारांनी न्यायालयात परस्पर समझोत्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही बाजूंमध्ये तडजोडीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, संबंधित पॉवर ऑफ अटर्नी ही नोंदणीकृत (रजिस्टर्ड) नव्हती. त्यामुळे नोंदणी कार्यालयात तिची माहिती उपलब्ध नसणे स्वाभाविक होते. तरीदेखील, पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे झालेल्या नोंदणी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण व्यवहाराची छाननी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगत, आवश्यक ती पुढील कारवाई तत्काळ करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
Advt……
1) Sai Ashirvad Complex, C Wing, Ground Floor, Tata Showroom समोर, Sundaram Naka, Mahim Road, Palghar, 📐 Area: 850 sq.ft.
🔹 2) HDIL, Bidco Naka जवळ, 17 No. Building, First Floor, Palghar, 📐 Area: 870 sq.ft.
✨ सर्व फ्लॅट्स योग्य (reasonable) दरात उपलब्ध आहेत.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Farid Lulania 📱 9890560786.
