पालघर जिल्ह्यात इयत्ता १२वीचा निकाल ८६.६८ टक्के

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ८६.६८ टक्के लागला आहे.

या परीक्षेस जिल्ह्यातून २८,७२४ मुलगे व २४,६९१ मुली असे एकूण ५३,४१५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४,०७५ मुलगे व २२,२३० मुली असे एकूण ४६,३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ८३.८१ टक्के तर मुलींचा निकाल ९०.०३ टक्के लागला असून मुलींची कामगिरी सरस ठरली आहे.

तालुकानिहाय निकालात मोखाडा तालुक्याने ९८.१८ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळवले आहे, तर वाडा (८९.२२ टक्के), विक्रमगड (८७.७९ टक्के) आणि पालघर (८७.८१ टक्के) तालुक्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी अभिनंदन केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button