

सौ. राजश्री कदम या ज्योतिष भूषण पदवीप्राप्त, अभ्यासू व अनुभवी ज्योतिष आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण वातावरणातून त्यांनी आपल्या आयुष्याची आणि कार्याची वाटचाल सुरू केली. कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मुंबईसारख्या महानगरात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. ज्योतिषशास्त्राचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अचूक भाकिते व सकारात्मक मार्गदर्शन यामुळे त्यांच्यावर लोकांचा मोठा विश्वास आहे. वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक अडचणींवर त्या समतोल व व्यवहार्य सल्ला देतात. ग्रामीण संस्कार आणि शहरी अनुभव यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा भावनेतून त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून शहरी यशापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
कोकणच्या मातीचा सुगंध मनात घेऊन जन्मलेली आणि सध्या मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास असलेल्या सौ. राजश्री कदम या केवळ एक ज्योतिष अभ्यासक नाही, तर श्रद्धा, साधना आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले असता असे जाणवते की, काही व्यक्तींच्या आयुष्यातील वळणे ही नियतीनेच ठरवलेली असतात आणि त्या वळणांवरून चालताना त्या स्वतःसह इतरांच्याही आयुष्याला प्रकाशमान करतात.
सौ. राजश्री कदम यांनी ज्योतिषशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून *‘ज्योतिष भूषण’* ही पदवी प्राप्त केली आहे. मात्र, त्यांचे ज्योतिष हे केवळ गणित, ग्रह-नक्षत्रे किंवा भविष्यकथनापुरते मर्यादित नाही; त्यामागे आहे ती खोल श्रद्धा, गुरुचरणी समर्पण आणि ईश्वरकृपेवर असलेला अढळ विश्वास. विशेषतः *श्री स्वामी समर्थ* यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा आहे. स्वामींच्या कृपेनेच आपण या मार्गावर आलो आहोत, असे त्या अत्यंत नम्रपणे सांगतात.
आपल्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्या केवळ “ग्राहक” म्हणून न पाहता, एक जिवंत मन, भावना आणि आशा घेऊन आलेली व्यक्ती म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन हे नेहमीच समजूतदार, वास्तववादी आणि सकारात्मक असते. त्या सांगत असलेले उपाय, तोडगे किंवा साधना हे रोजच्या जीवनात सहज करता येण्यासारखे असल्यामुळे लोकांना त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते. कोणतेही अवडंबर न करता, श्रद्धेच्या बळावर साध्या उपायांतून जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो, ही त्यांची ठाम भूमिका आहे.
आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक व्यक्तींना मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि आशेचा नवा किरण मिळाला आहे. काही जण फोन करून आभार मानतात, तर काही जण प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करतात. अशा क्षणी “आपण एखाद्याच्या आयुष्यात उपयोगी पडतो आहोत” याचे जे समाधान मिळते, ते शब्दात मांडता येत नाही, असे त्या सांगतात. हा व्यवसाय नसून, ती एक सेवा आहे, अशीच त्यांची भावना आहे.
मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणी, संकटे आणि कठीण प्रसंग आले. त्या वेळी मार्गदर्शनासाठी त्या एका अनुभवी ज्योतिषतज्ज्ञांकडे गेल्या. तेथेच त्यांच्या लक्षात आले की, आपल्याला या विषयात गती आहे, समज आहे आणि विशेष म्हणजे या विषयाचा अभ्यास करण्याची खरी आवड आहे. याच जाणिवेतून त्यांनी जिद्दीने ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी लोकांना योग्य दिशा दाखवण्यास सुरुवात केली.
सौ. राजश्री कदम नेहमीच सांगतात की, नियतीच्या कारभारात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. विधिलिखित बदलता येत नाही. मात्र योग्य साधना, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काही संकटांची तीव्रता नक्कीच कमी करता येते. त्यासाठी ईश्वराची आणि गुरूंची निष्ठेने आराधना करणे अत्यावश्यक आहे. ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा नसून, योग्य समज आणि विवेकाने वापरले तर ते जीवनाला दिशा देणारे शास्त्र ठरू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
आज दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे, याचे कारण केवळ त्यांचे ज्ञान नाही, तर त्यामागे असलेली त्यांची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि सेवाभाव आहे. श्रद्धा आणि शास्त्र यांचा समतोल साधत, स्वामींच्या कृपेने त्या अनेकांचे जीवन अधिक सुसह्य, सकारात्मक आणि आशेने भरलेले करण्याचा प्रयत्न करत आहेत.

श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत, सौ. राजश्री कदम यांचा हा सेवाप्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा. सौ. राजश्री कदम यांचा संपर्क क्रमांक 8108321271 हा आहे.
शब्दांकन : मंगेश तावडे
