दोन्ही शिवसेनेच्या सैनिकांनी एकत्रित साजरी केली बाळासाहेबांची जन्मशताब्दी

शिवसैनिकांनी बाळासाहेबांना वाहीली आदरांजली

नागोठणे : महेंद्र माने 

येथील विभागीय शिवसेना शाखेत शुक्रवार 23 जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे,जिल्हा महिला उपसंघटिका दर्शना जवके, ग्रा.पं. सदस्या ज्योती राऊत, उपविभाग प्रमुख बळीराम बडे तसेच शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर, विभाग संघटक दिनेश घाग, विभाग प्रमुख प्रवीण ताडकर ,नागोठणे जि. प. उमेदवार सुमित काते यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्रीत येऊन साजरी केली.

या निमित्ताने शहरातील रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उमेदवार अंजली दुर्गावले, लहू तेलंगे, बाळू रटाटे, मुकेश भोय, अजय दळवी, राजेश सुर्वे, सुरेश गायकर ,संजय पाटील, इम्रान पानसरे, अविनाश भोसले, संतोष चितळकर, संजय कणघरे, छबिलदास कोतवाल, प्रकाश मोरे, चेतन कामथे, सोहेल पानसरे, शैलेश चव्हाण, कैलास गोरे, दीप्ती दुर्गावले, संजय पिंपळे, हिराजी दुर्गावले, नागेश सुर्वे, संतोष घोसाळकर ,विजय धामणे, अजय पत्की, दिनेश वादळ, सुरेश कांबळे, रमेश शिर्के, वर्षा सहस्त्रबुद्धे, नितीन पत्की यांच्यासह विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चा करून पुष्पहार अर्पण केल्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणपत म्हात्रे यांनी सांगितले की, बाळासाहेबांनी संपूर्ण देशाला कोणतेही भेदभाव न करता हिंदुत्वाचे शिक्षण देत चळवळ उभी केली. त्यामुळे ते जगात हिंदूहृदयसम्राट म्हणून अजरामर झाल्याचे सांगून आपण सर्व शिवसैनिक म्हणून एकझुट राहण्याच्या सल्ला दिला. दर्शना जवके यांनी कोणतेही मतभेत दुजाभाव विसरून एकत्रीत येत आपण केलेले कार्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे सांगितले. बळीराम बडे यांनी बाळासाहेबांचे महान विचार कोणीच विसरू शकत नसून जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नसल्याचे सांगितले. सुमित काते यांनी बाळासाहेबांनी कोणताही जातीय भेद न करता शिवसेनेच्या रूपाने अन्याया विरुद्ध लढा देत मराठी लोकांना संघटित राहायला शिकविले. दिनेश घाग यांनी कधीही निवडणूक न लढविता महान माणसे घडविणारे बाळासाहेब असल्याचे सांगितले. प्रकाश मोरे यांनी मराठी माणसाला जागे ठेवण्याचे कार्य बाळासाहेबांनी केल्याचे सांगितले.संजय कणघरे यांनी बाळासाहेबांमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद राहणार असल्याचे सांगितले. बाळू रटाटे यांनी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रूपाने लावलेल्या बिजाचे वट वृक्षात रूपांतर झाले असून आम्ही सर्व भगव्याचे पाइक असल्याचे सांगितले. उपस्थितांचे स्वागत राजेश सुर्वे यांनी तर आभार दर्शना जवके यांनी मानले. तसेच या निमित्ताने शहरातील रुग्णालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.           

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button